अप्सरा सोनाली कुलकर्णी ही विविध पेहरावात सुंदर दिसते. नऊवारी साडी आणि इतर पारंपारिक वेशभुषेसह वेस्टर्न आउटफीटमधीलही तिचे लुक सुंदर दिसतात.
नुकतच सोनालीने सोशल मिडीयावर तिचा एक खास लुक शेयर केला आहे. या लुकमध्ये टू पिस ड्रेसमध्ये सोनाली सुंदर दिसतेय. निळ्या रंगाचा बो ब्लॉउज आणि जांभळं-निळं कॉम्बिनेशन लेहंगा सोनालीवर उठुन दिसतोय.
नुकत्याच एक पुरस्कार सोहळ्यात सोनालीला गौरवण्यात आलं होतं. याच सोहळ्यासाठी सोनालीने हे खास आउटफीट लुक केलं होतं. सोशल मिडीयावर सोनालीच्या या लुकला पसंती मिळतेय.