'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाने गेली काही वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवलं. यावर्षीही या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. लॉकडाउनच्या काळातही या विनोदी कार्यक्रमाच्या जुन्या भागांनी प्रेक्षकांना पोटधरुन हसवलं. आता नव्या वर्षाची सुरुवात करत असताना आणि 2020 ला निरोप देत असताना हे विनोदवीर पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.
यंदा 31 डिसेंबर रोजी रात्री कर्फ्यू असल्याने विनोदाचा खास डोस हास्यजत्रेत पाहायला मिळणार आहे. तेव्हा नाईट कर्फ्यूवर लाफ्टरचा उतारा आला आहे. यासाठी हास्यजत्रा चल हट 2020चा भाग प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येणार आहे. तेव्हा घरात बसून हा हास्याचा डोस 2020 ला निरोप देताना प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
2020 वर्ष कधी संपतय यासाठी अनेक जण वाट पाहत आहेत. यावर्षात कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनचा अनेकांना त्रास झाला, म्हणूनच हे वर्ष कधी संपतय आणि कधी 2021 हे वर्ष येतय याची अनेकांना उत्सुकता आहे. तेव्हा 2020 ला चल हट म्हणत 2021चं स्वागत करण्यासाठी हास्यजत्रेचे विनोदवीर प्रेक्षकांसाठी भरपुर मनोरंजन घेऊन येत आहेत.