पाहा Video : हा व्हिडीओ शेयर करत अमेय वाघ म्हणतो

By  
on  

2020 हे वर्ष अनेकांना काहीना काही शिकवून गेलय.वर्षाला निरोप देत असताना अनेकांनी या वर्षाविषयी विविध पोस्ट सोशल मिडीयावर केल्या आहेत. आणि आता सगळ्यांनाच 2021 या वर्षाची उत्सुकता आहे. यातच अभिनेता अमेय वाघनेही एक खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्ट केलेल्या व्हिडीओत अमेय चक्क गाणं गाताना दिसतोय.

'दिल दोस्ती दुनियादारी'चं गाणं अमेयनं या व्हिडीओत गायलं आहे. अमेयच्या मित्राच्या संगीत कार्यक्रमात अमेयने हे गाणं गायलं होतं, त्याचाच हा व्हिडीओ आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

2020 वर्षाला निरोप देत असताना आणि 2021 चं स्वागत करण्यासाठी अमेयने हा व्हिडीओ शेयर केला आहे. अमेय या पोस्टमध्ये लिहीतो की, "2020 ने लई दुनियादारी शिकवली . 2021 आपल्याला दिल आणि दोस्ती शिकवेल !! पॉजिटीव्ह राहा!! हा शेवटच्या मिनिटाला केलेला परफॉर्मन्स शार्दुलच्या संगीत कार्यक्रमातील आहे. आनंदी 2021"

Recommended

Loading...
Share