By  
on  

पाहा Video : जीममध्ये वर्कआउट करताना अभिनेता सिद्धार्थ जाधवला हे गाणं देतं बळ

अभिनेता सिद्धार्थ जाधव हा त्याच्या फिटनेससाठी बरीच मेहनत घेतो. त्यासाठी तो दररोज जीममध्ये वर्कआउट करतो. अनेकांना प्रेरणा देणाऱ्या या कलाकारालाही प्रेरणेची गरज भासते. तेव्हा काही जुनी गाणी त्याला बळ देतात. 

सिद्धार्थ जाधवने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. याला कारणही महत्त्वाचं आहे. सिद्धार्थ जीममध्ये वर्कआउट करताना कधी कधी जुनी गाणीही गुणगुणतो. आणि हीच गाणी त्याला बळ देत असल्याचं तो या पोस्टमध्ये म्हणतोय. सिद्धार्थने त्याच्या वर्कआउट व्हिडीओला एैरणीच्या देवा तुला हे जुनं प्रसिद्ध गाणं जोडलं आहे. एकीकडे सोशल मिडीयावर अनेक स्टार्स त्यांच्या वर्कआउट व्हिडीओंना इंग्रजी किंवा थिरकायला लावणारी हिंदी गाणी जोडतात. मात्र सिद्धार्थने हे सुंदर गाणं त्याच्या वर्कआउटला जोडून त्याच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

सिद्धार्थ या पोस्टमध्ये लिहीतो की, "गोड गाणी गुणगणत असतात मनातल्या मनात....तीच गाणी जणू वेगळं बळ देतात काहीतरी करून दाखविण्यासाठी या जगात!"

 

सिद्धार्थ हा एक मेहनती गुणी अभिनेता आहे. करियरच्या सुरुवातीच्या काळात नाट्यसृष्टी गाजवल्यानंतर त्याने अनेक मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. शिवाय सिद्धार्थ हा हिंदी सिनेमांमधूनही उत्तमोत्तम व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळवतोय. 

सोशल मिडीयावर सिद्धार्थने शेयर केलेल्या या व्हिडीओची चर्चा आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive