पाहा Photos : बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा पति तेजसोबत हनीमूनसाठी पोहोचली या खास ठिकाणी

By  
on  

मागील वर्षी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा विवाहसोहळा पार पडला. शर्मिष्ठाच्या लग्नाचे विविध कार्यक्रम मागच्या वर्षी पार पडले. सोशल मिडीयावरही हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत राहिला. मागील शर्मिष्ठाने तेजसशी लगीनगाठ बांधली मात्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत दोघं हनीमूनसाठी गेले नव्हते.

2021 या वर्षात दोघांनी हनीमूनला जायचं ठरवलं. एवढच काय तर दोघं आता हनीमूनसाठी खास डेस्टिनेशला पोहोचले आहेत. शर्मिष्ठा आणि तेजसने हनीमूनसाठी हनीमूनसाठी मालदीव हे ठिकाण निवडलं आहे. नुकतच शर्मिष्ठा आणि तेजस मालदीवला पोहोचले आहेत.शर्मिष्ठाने तिच्या हनीमूनचे खास फोटोही सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

 

शर्मिष्ठा ही अनेक मराठी मालिकांमध्ये झळकली आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात शर्मिष्ठा वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून झळकली होती. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून तेजसशी ओळख झाल्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन मागील वर्षी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. 

Recommended

Loading...
Share