चेहऱ्याच्या आणि रंगाच्या सुंदरतेपेक्षा आंतरिक सौंदर्य महत्त्वाचं असा विषय़ असणारी 'रंगा माझा वेगळा' ही मालिका आहे. या मालिकेत सासू सौंदर्या इनामदार ही आपली सून दीपाच्या सावळ्या रंगाचा द्वेष करताना दाखवलं आहे. सध्या इनामदार कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. याचं कारण म्हणजे दीपा प्रेग्नेंट आहे. दीपाच्या प्रेग्नेंसीची बातमी कळताच पति कार्तिकही प्रचंड आनंदी झाला आहे.
यातच सौंदर्याची दीपाकडून वेगळीच अपेक्षा आहे. सगळं काही ठीक असतानाही सौंदर्या अजूनही काळ्या रंगाचा द्वेष करताना दिसतेय. म्हणूनच की काय दीपाच्या प्रेग्नेंंसीनंतर सौंदर्याला धक्का बसला आहे. दीपाचं बाळ तिच्यासारखं सावळ्या रंगाचं असेल याची तिला भिती आहे.
नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दाखवलयं की, दीपा देवाकडे प्रार्थना करतेय आणि सौंदर्या तिला देवाकडे बाळाचं आरोग्य आणि प्रेग्नेंसीविषयी देवाकडे प्रार्थना करायला सांगते. मात्र होणार बाळ गोरंपान असू दे ही इच्छा व्यक्त करते. हे ऐकून दीपाला धक्का बसतो.
तेव्हा सौंदर्याची ही इच्छा आता पूर्ण होईल का ? हे आगामी भागांमधून समोर येईलच.