By  
on  

पाहा Video : या गाण्यावर थिरकल्या 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील या अभिनेत्री

'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका नातेसंबंधांवर आधारित मालिका आहे. ही मालिका जितकी लोकप्रिय तितकेच मालिकेच्या सेटवर कलाकारांचे व्हिडीओही चर्चेत असतात. या मालिकेतील कलाकारांची जबरदस्त मैत्री झाली आहे. सोशल मिडीयावर तर या मालिकेतील कलाकारांचे एकापेक्षा फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात.

या मालिकेतील अभिनेत्री नंदिता पाटकर आणि किशोरी आंबिये यांचा धमाल डान्स व्हिडीओ चर्चेत आला आहे. कजरा मोहोब्बत वाला या गाण्यावर दोघींचा हा सुंदर डान्स लक्षवेधी ठरतोय. या मालिकेच्या सेटवर ब्रेकटाईम आणि निवांत वेळेत हे कलाकार अशाप्रकारे जबरदस्त व्हिडीओ तयार करतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nandita Patkar (@mi_nandita)

 

एवढच नाही तर अभिनेत्री किशोरी आंबिये सेटवरील विविध कॉमेडी व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर करून सगळ्यांना हसवत असतात. 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील कलाकार तर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यांनी केलेल्या व्हिडीओंना हजारो लाईक्स आणि असंख्य चाहत्यांची पसंती पाहायला मिळतेय. हे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरलही होत असतात. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive