By  
on  

पाहा Photos : या कलाकारांकडून कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेला मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री श्रेया बुगडेवर आज वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर वाढदिवसानिमित्ताने श्रेयाला पोस्ट करून विश केलं जात आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून श्रेयाने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचं कॉमेडीचं टायमिंग, हुबेहुब नकला करणं आणि जबरदस्त परफॉर्मन्स या कलागुणांचे असंख्य चाहते आहेत. यापैकी मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी जे तिचे मित्रमैत्रिण आहे तेही श्रेयाचे चाहते असल्याचं वारंवार सांगतात. याच कलाकारांनी श्रेयाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री रेश्मा शिंदेने श्रेयासोबतचे खास फोटो पोस्ट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेक कलाकारांची श्रेया ही आवडती अभिनेत्री आहे. म्हणूनच तिच्यासोबतचे फोटो पोस्ट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही श्रेयासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

अभिनेता सौरभ गोखले, अभिज्ञा भावे, गायिका सावनी रविंद्र, स्वानंदी टिकेकर यासह अनेक सेलिब्रिटींकडून श्रेयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive