By  
on  

रवी जाधव यांच्या 'टाईमपास 3'साठी ही गायिका गाणार गाणं

रवी जाधव यांच्या टाईमपास सिरीजने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. त्यातच 'टाईमपास 3' ची वाट पाहत असताना नुकतीच या सिनेमाचीही घोषणा करण्यात आली होती. टाईमपास 3 मध्ये प्रथमेश परब आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे झळकणार असल्याचं रवी जाधव यांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितलं होतं. फक्त '3' चा हॅशटॅग लिहून त्यांनी ही हिंट दिली होती. 

रवी जाधव 'टाईमपास 3' च्या कामाला सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतय. नुकतच रवी जाधव यांनी एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये रवी जाधव यांनी गायिका शाल्मली खोलगडेसोबतचा फोटो शेयर केला आहे. याचं कारणही खास आहे. कारण शाल्मली सध्या टाईमपास 3 साठी गाणं रेकॉर्ड करत आहे. इथेही कुठेही टाईमपासचा उल्लेख न करता फक्त '3' चा उल्लेख करण्यात आला आहे.

तेव्हा 'टाईमपास 3' मधील गाण्याला शाल्मलीचा गोड आवाज लाभणार एवढं नक्की. 'टाईमपास', 'टाईमपास 2' नंतर आता 'टाईमपास 3' ची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार यात शंका नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive