सोनाली कुलकर्णीने पोस्ट केला मंगळसुत्र घातलेला फोटो, दिलं हे भन्नाट कॅप्शन

By  
on  

दिलखेच अदांनी आणि काळजात रुतेल अशा नजरेने अवघ्या महाराष्ट्राला घायाळ करणारी अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिचे विविध लूक्स ती नेहमीच आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर शेअर करत असते. चाहत्यांनासुध्दा तिच्या विविध अदा एका क्लिकवर पाहता येतात. 

 

 

आताही सोनालीने नुकताच एक गोड फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिचा मंगळसुत्र घातलेला फोटो तिने पोस्ट केला आहे. पण या फोटोला दिलेल्या कॅप्शनने मात्र लक्ष वेधून घेतलं आहे. #reallife शादी अभी बाक़ी है. This is reel life look .  हे कॅप्शन देत सोनालीने हा फोटो शेअर केला आहे. या लूकमध्ये सोनाली खुपच सुरेख दिसतीये. सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबत मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा केला होता. चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता आहे.

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share