By  
on  

सोनाली कुलकर्णी आणि अक्षय बर्दापुरकर प्रेझेंट करणार पहिली रिजनल वेब फिल्म 'हाकामारी'

रहस्यमयी सिनेमे प्रेक्षकांना कायम आकर्षित करतात. अशा सिनेमाच्या प्रवासात प्रेक्षकांच चांगलं मनोरंजन होताना दिसत. असाच एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण तो काल्पनिक नसून महाराष्ट्रातील एका कोपऱ्यातील वास्तवीक जीवनावर प्रेरित आहे. हा सिनेमा एक पहिली रिजनल वेब फिल्म असून त्याचं नाव आहे 'हाकामारी'.

हा सिनेमा एक सस्पेन्स थ्रिलर असेल. प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापुर आणि नवोदित निर्माती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठीत पहिल्यांदा अशाप्रकारची वेब फिल्म प्रेझेंट करत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस या वेब फिल्मचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाच्या निर्मात्यांनी अद्याप याविषयी जास्त माहिती समोर आणलेली नाही.

नुकत्याच एका वेब पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार सोनाली याविषयी सांगते की, "मी अभिनेत्री होण्याआधी मी निर्माती होती. माझ्या रेडिओ, टिव्ही, फिल्म प्रोडक्शनविषयीच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी मी विद्यार्थी असल्यापासून मला सिनेमा निर्मितीने रोमांचित केलं आहे. मराठी फिल्म उद्योगात प्रतिभेचा भंडार आहे. मला माझ्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक गोष्टी घेऊन यायच्या आहेत. मराठी सिनेमा आणि समीरच्या या शिल्पासाठी अक्षयचा दृष्टीकोन तसाच आहे जहा 'हाकामारी'साठी अपेक्षित आहे."

 तेव्हा या वेब फिल्मच्या निमित्ताने निर्मितीत पदार्पण करणारी सोनाली या सिनेमातून प्रेक्षकांसाठी काय घेऊन येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive