उमेश कामत आणि प्रिया बापटला कोरोनाची लागण, दोघं घरात सेल्फ क्वारंटाइन

By  
on  

यावर्षी पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पाहायला मिळतय. यातच अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत असून या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट या प्रसिद्ध जोडीलाही कोरोनाची लागण झाली आहे. दोघांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याचं दोघांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगीतलं आहे. सध्या दोघांनी घरातच स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे.

नुकतच उमेश आणि प्रियाने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट पाहुन अनेकांना धक्का बसला आहे. दोघांची कोव्हिड 19 चाचणी पॉझिटीव्ह आल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलय. उमेश या पोस्टमध्ये लिहीतो की, "दुर्दैवाने मी आणि प्रियाची कोव्हिड 19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्या आम्ही घरात सेल्फ क्वारंटाइन आहोत. आवश्यक ती औषधे घेत आहोत आणि सावधगिरी बाळगतोय. सगळ्या नियमांचेही पालन करतोय. मागील आठवड्यात जे कुणीही आमच्या संपर्कात आले असतील त्यांनी कोव्हिड चाचणी करुन घ्यावी किंवा स्वत:ला आयसोलेट करावं."

 

प्रिया आणि उमेश या प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीचे चाहते आणि निकटवर्तीय त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

Recommended

Loading...
Share