By  
on  

बने कुटुंबियांना करावी लागतीये हॉस्पिटलची वारी

आपल्या घरी कोणी आजारी पडलं की सर्व घराची एकच धांदल उडतेसर्व कुटुंबीय आजारी माणसाच्या सेवेत गढून जातातत्यातच पेशंट जर हॉस्पीटलाईझ्ड असेल तर विचारायलाच नकोआपल्या पेशंटसाठी डबा बनवणे आणि घेऊन जाणेडॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर त्याला देणे आणि कोणीतरी सतत त्याच्या जवळ राहून त्याला काय हवे नको ते बघणे हेओघानेच येते.स्वतःला धीर देत पेशंटलाही धीर द्यावा लागतोवेगवेगळ्या टेस्ट्सरिपोर्ट्सगोळ्या-औषधे या सर्वांमध्ये आपण भांबावून नाही गेलो तर नवलचआपल्यापैकी प्रत्येकजण कधीतरीहॉस्पिटलच्या अनुभवातून आधी गेलेला असूनही प्रत्येक अनुभव हा जरा वेगळाच असतो.

प्रत्येक हॉस्पिटलडॉक्टर आणि स्टाफ यांच्या तऱ्हा सांभाळत आपल्या प्रिय व्यक्तीच्याउपचारात जराही हलगर्जी होऊ नये त्यांच्याशी गोडीगुलाबीने वागतोपथ्य सोडून पेशंटचे खाण्यापिण्याचे लहरी हट्ट पुरवताना कधीकधी डॉक्टरांचा ओरडा खावा लागतोपेशंटला भेटायलायेणारे निरनिराळे नातेवाईक आणि त्यांचे नकोसे सल्ले याने बऱ्याचदा मनस्ताप होतोया हॉस्पीटलवारी मध्ये सगळे घरच हॉस्पीटलाईझ्ड आहे की काय असे वाटू लागतेतरीसुद्धा हॉस्पिटलचाहा अनुभव घरातील सर्वांना एकत्र जोडतोसर्व कुटुंबीयांनी केलेल्या सहकार्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीने बरे होऊन डिस्चार्ज घेतल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान मिळते.

असाच प्रसंग गुदरला आहे ‘हबने तुबनेमालिकेतील बने कुटुंबावरमकरंदला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. ‘बने तु.बनेमालिका नेहमीच प्रेक्षकांशी कनेक्ट होणारे विषय घेऊन येतेआपल्या रोजच्या जीवनातील आंबटगोड प्रसंगांचे गंभीर तरीही विनोदी चित्रण या मालिकेमध्ये पहायला मिळतेआता या प्रसंगामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या स्वभावाचे बने कुटुंबीय काय मजेशीर गोंधळ घालतील हे बघायला खरंच मजा येणार आहेहे सर्व पहा बने तुबने'च्या २२ एप्रिल ते २७ एप्रिलच्या भागांत, फक्त सोनी मराठीवर.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive