या कारणासाठी एकत्र आल्या या टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध मालिकांमधील तारका

By  
on  

सध्या विविध मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यातच स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. याच वाहिनीचा पुरस्कार सोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात काही खास गोष्टी पाहायला मिळणार आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांच्या कलाकारांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स पाहायला मिळतील. तर कलाकारांना पुरस्कारही दिले जातील. कलाकारांचे विविध परफॉर्मन्स या पुरस्कार सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरेल. सोशल मिडीयावर सध्या या पुरस्कार सोहळ्याचे काही क्षण पाहायला मिळत आहेत. यातच एक फोटो सगळ्यांचं लक्ष वेधतोय. या फोटोत स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमधील अभिनेत्री एकत्र पोझ देताना दिसत आहेत. त्यांचा पेहरावही एक सारखा दिसत आहे. पांढऱ्या रंगाची नऊवारी नेसून या अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहेत. हा फोटो पाहुन या अभिनेत्रींचा काही खास परफॉर्मन्स पाहायला मिळणार असं चित्र पाहायला मिळतय. 'सहकुटुंब सहपरिवार', 'आई कुठे काय करते', 'रंग माझा वेगळा', 'सांग तू आहेस का ?', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'तुझ्या इश्काचा नादखुळा', 'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ या प्रसिद्ध मालिकांमधील या प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्री या फोटोत दिसत आहेत.

काही कलाकारांनी सोशल मिडीयावर हे फोटो शेयर केले आहेत. तर या अभिनेत्री डान्स करत असल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. नेमका कसा असेल हा परफॉर्मन्स ? आणखी काय सरप्राईज या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळतील हे लवकरच समोर येईल. येत्या 4 एप्रिल रोजी हा पुरस्कार सोहळ्या प्रसारित करण्यात येईल. 

Recommended

Loading...
Share