सध्या कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता केंद्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यातच कोविड लसीकरणही सुरु आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारही या विषाणूच्या विळख्यात सापडले आहे. यात खबरदारी म्हणून अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या पालकांनीही कोविड 19 लस घेतली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या आई-वडिलांनीही कोविड -19 लस घेऊन वॅक्सिनेशन केलय. सोनालीने सोशल मिडीयावर याविषयी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सोनाली लिहीते की, "माझ्या आई बाबांचं लसीकरण झालंय.. लॉकडाऊन होईल किंवा होणारही नाही, ते आपल्या हातात नाही. पण आपली सुरक्षितता ही केवळ आपली जबाबदारी आहे. काळजी घेऊयात, आपली आणि आपल्या कुटुंबाची P.S. आता लसीकरण सरसकट सगळ्यांसाठी सुरू व्हायला हवं हीच विनंती."
तेव्हा लसीकरण हे सगळ्यांसाठी सुरु करण्यात यावं अशी विनंती सोनालीने या पोस्टमध्ये केली आहे. तर अभिनेत्री क्रांति रेडकरच्या पालकांनीही कोविड लसीकरण केलं आहे. क्रांतिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही माहिती दिली. ती लिहीते की, "माझ्या रॉकस्टार्सनी हे पूर्ण केलं. जेव्हा मी त्यांना घेऊन गेले तेव्हा मला रिलसाठी खूप मटेरियल मिळालय, उफ..."
सोशल मिडीयावर क्रांतिचे अनेक कॉमेडी, मजेशीर रिल व्हिडीओ पाहायला मिळतात. तेव्हा आई-वडिलांचं लसीकरण केल्यावर क्रांतिला मात्र रिलसाठी मटेरियल मिळाल्याची मजेशीर पोस्ट तिने केली आहे.