2020 पूर्ण वर्ष कोरोनाग्रस्त काळात गेलं. यातच नव्या वर्षात म्हणजेच 2021 या वर्षाकडून सगळ्यांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. वर्षाच्या सुरुवातीचा काळ बरा होता मात्र आता पुन्हा एकदा चित्र हे मागील वर्षासारखच दिसतय. कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहेत. त्यातच केंद्र सरकारने आता कोरोनाग्रस्त परिस्थितीत नवीन नियमावली जाहीर केली आहे. अनेक जण हे या कोरोना विषाणूने कंटाळले आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनाही या कोरोनाचा प्रचंड कंटाळा आला आहे. इतका कंटाळा आला की त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करुन ही भावना व्यक्त केली आहे. समीर म्हणतात की, "रोज इतके पटापट कोविड ग्रस्त होतायत. ह्या कोविडच्या दहशतीत जगायचा कंटाळा आलाय. भितीनेच कित्येकदा सर्दी झाल्येस वाटतं. उगाच अंग गरम होतं. भीती कमी झाली की नॅार्मल. परत एखादी बातमी येते. ह्यापेक्षा ना ‘काय तो एकदाचा होऊन जाऊदे!’ असं वाटायला लागलंय! (कोणालाच होऊ नये) पण तरी."
तेव्हा या कोरोनामुळे कंटाळलेल्या समीर यांनी चक्क सोशल मिडीयावर ट्विट करून जगायचा कंटाळा आल्याचं सांगत भिती आणि राग व्यक्त केला आहे.
रोज इतके पटापट कोविड ग्रस्त होतायत. ह्या कोविडच्या दहशतीत जगायचा कंटाळा आलाय. भितीनेच कित्येकदा सर्दी झाल्येस वाटतं. उगाच अंग गरम होतं. भीती कमी झाली की नॅार्मल. परत एखादी बातमी येते. ह्यापेक्षा ना ‘काय तो एकदाचा होऊन जाऊदे!’ असं वाटायला लागलंय! (कोणालाच होऊ नये) पण तरी.
— Sameer Vidwans (@sameervidwans) April 6, 2021
कोरोनामुळे अनेकांचे नुकसान झाले, अनेकांनी जीव गमावले या सगळ्यात यावर्षीही या देशावर कोरोनाचं सावट आहे. त्यात मनोरंजन विश्वातील कलाकारही या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. नवीन नियमावलीनुसार चित्रीकरणास बंदी नसली तरी विविध नियम जाहीर करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे सध्या सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद असल्याने अनेक कलाकार आणि क्रू मेम्बर्सना विविध अडचणींना सामोरं जावं लागतय.