By  
on  

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेला पितृशोक, सोशल मिडीयावर केली पोस्ट

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वडिलांचे निधन झाले आहे. भाग्यश्रीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून याविषयी स्वत: माहिती दिली आहे. वडिलांच्या आठवणीत भाग्यश्रीने त्यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. 

"शांततेत विश्रांती घ्या बाबा" असं तिने या पोस्टमध्ये लिहीलय.

 

वडिलांच्या निधनाने भाग्यश्रीवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. सोशल मिडीयावरही अनेकांना भाग्यश्रीच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

'घाडगे अँन्ड सून' या मालिकेतून भाग्यश्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मिडीयावरही भाग्यश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive