या नव्या वेबसिरीजच्या निमित्ताने अभिजीत, मृण्मयी, शशांक झळकणार एकत्र

By  
on  

सध्या प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मची जोरदार चर्चा आहे. या ओटीटीवर लवकरच बऱ्याच मराठी वेबसिरीज पाहायला मिळणार आहेत. काही वेबसिरीजचं चित्रीकरणही सध्या सुरु आहेत. यातच आणखी एका आगामी वेबसिरीजची घोषणा करण्यात आली आहे.

'सोपं नसतं काही' असं या वेब सिरीजचं नाव असून या वेबसिरीजमध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकर, शशांक केतकर आणि मृण्मयी देशपांडे हे कलाकारा मुख्य भूमिकेत झळकतील. अभिनेता आनंद इंगळे या सिरीजमध्ये पाहुणा कलाकार आहे. या वेब सिरीजचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत या तिन्ही बाजू मयुरेश जोशी यांनी सांभाळल्या आहेत.या वेबसिरीजच्या निमित्ताने अभिजीत खांडकेकर, शशांक केतकर आणि मृण्मयी देशपांडे हे कलाकार पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.

विप्लवा एन्टटरटेन्मेंट एलएलपीचे संतोष रत्नाकर गुजराथी या सिरीजचे निर्माते आहेत. विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपीने याआधी रंगभूमीवर ॲब्सोल्युट, घरात मॅरीड बाहेर बॅचलर, नॅाक नॅाक सेलीब्रीटी अशी वैविध्यपूर्ण नाटके  तर छोट्या पडद्यावर रुद्रम, कट्टीबट्टी अशा मालिकांची निर्मिती केली आहे. किस्से बहाद्दर या वेब सीरिजची निर्मिती देखील त्यांनी केली होती.  

Recommended

Loading...
Share