'इमली' या हिंदी मालिकेत अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री मयुरी देशमुख झळकत आहेत. या मालिकेतील वेगळ्या कहाणीने प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. शिवाय मालिकेची स्टारकास्टही प्रेक्षकांची मनं जिंकतेय. मालिकेत मयुरी ही साकारतेय मालिनी ही भूमिका. तर गश्मीर हा आदित्य कुमार त्रिपाठीच्या भूमिकेत आहे. मालिकेत यांच्या वेगळ्या भूमिका असल्या तरी ऑफस्क्रिन मात्र दोघं चांगलीच मस्ती करताना दिसत आहेत. अर्थात त्यांच्यातील मैत्री घट्ट झाल्याचं पाहायला मिळतय.
गश्मीरने नुकतेच मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये गश्मीर आणि मयुरीची मस्ती पाहायला मिळतेय. यावरुन दोघांची घट्ट मैत्री झाल्याचही पाहायला मिळतय. गश्मीर लिहीतो की, "मेकर्स आम्हाला ऑन स्क्रिन भांडायला लावतात. हे घ्या आदिनीची झलक तुमच्यासाठी."
दोघांची ही केमिस्ट्री पाहून या जोडीला मराठी मालिकेत किंवा सिनेमांमध्ये पाहायला मजा येईल यात शंका नाही.