By  
on  

अभिनेत्री रुचिता जाधवच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात, लवकरच वाजणार सनई चौघडे

अभिनेत्री रुचिता जाधव येत्या 3 मे रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. आनंद माने या बिझीनेसमन सोबत ती लगीनगाठ बांधणार आहे. पाचगणी येथील फार्महाऊसवर हा लग्नासोहळा काही जवळचे मित्रमंडळी आणि परिवाराच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत मोजक्याच मंडळी्ंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

नुकतच रुचिताच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकताच ग्रहमख पूजन विधी पार पडला आहे. यावेळी रुचिताचे जवळचे नातलग उपस्थित होते. यावेळी रुचिता मराठमोळ्या पेहरावात दिसली. या खास सोहळ्याचे फोटो रुचिताने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. शिवाय तिच्या बॅचलरेट पार्टीचेही फोटो शेयर केले आहेत.

या कार्यक्रमानंतर रुचिताच्या लग्नाआधी मेहंदी, हळद आणि संगीत हे कार्यक्रमही पार पडणार आहेत. 

 

रुचिताने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  ‘लव्ह लग्न लोचा’, ‘कालाय तस्मै नमः’, ‘वीर शिवाजी’ या मालिका तसेच ‘भूताचा हनिमून’, ‘वात्सल्य’ आणि ‘माणूस एक माती’ या चित्रपटांमध्ये रुचिता झळकली आहे. .

Author

Recommended

PeepingMoon Exclusive