By  
on  

पाहा Video : 'पप्पी दे पारुला' फेम स्मिता गोंदकरने समुद्र किनारी चित्रीत केलं हे गाणं, 'साजणी तू' गाणं प्रदर्शित

'पप्पी दे पारुला' या गाण्यानंतर अभिनेत्री स्मिता गोंदकर प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर अनेक विविध गाण्यांमध्ये स्मिता झळकली आहे. पुन्हा एकदा स्मिता तिच्या अदांनी प्रेक्षकांना मोहिनी घालतेय. नुकतच स्मिताचं 'साजणी तू' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. समुद्रकिनारी आणि निसर्गरम्य ठिकाणी हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून या गाण्यात स्मिताच्या सुंदर अदा पाहायला मिळत आहेत.

 

आदित्य बर्वेनं या म्युझिक व्हिडिओचं संगीत आणि दिग्दर्शन केलं आहे. अंबरीश देशपांडेनं लिहिलेलं हे गाणं ऋषिकेश रानडेनं गायलं आहे. अशोक पवार या म्युझिस व्हिडिओचे छायालेखक आहेत. रोहन गोगटे, अजित नेगी यांनी संकलन केलं आहे.  

मराठी सिनेमांमध्ये काम करत असताना स्मिताने अनेक हिंदी स्टंट शोमध्ये सहभाग घेतला होता. तिचे बाईक स्टंट्स तर प्रचंड चर्चेत आहेत. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात स्मिता स्पर्धक म्हणून दिसली होती. तर स्मिता सध्या कॉमेडी बिमेडी या विनोदी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive