प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार आणि वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. रोहित यांना काही दिवासांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालय. न्यूज चॅनेलच्या दुनियेतील एक अभ्यासु आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राेहित यांच्या निधनाने सोशल मिडीयावर अनेक जण दु:ख व्यक्त करत आहेत.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही रोहित यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र रोहित यांच्या निधनाने संकर्षणला फार वाईट वाटलय. संकर्षण हा त्यांचे चॅनेलवरील कार्यक्रम पाहत असे. शिवाय एक स्पष्टवक्त, अभ्यासु, हजरजबाबी वृत्तनिवेदक म्हणून त्यांची ओळख असल्याचं तो सांगतो.
संकर्षण पोस्टमध्ये लिहीतो की, "काही ऋुणानुबंध शब्दात सांगताच येत नाहीत..त्यांना भेटीची गरज असतेच असंही नाही.... ते फक्तं जोडले जातात.मी ह्या व्यक्तीचं वृत्तनिवेदन नेहमी पहायचो, ऐकायचो.. घरी नसलो तर; युट्यूबवर पहायचो.. लाईव्ह चॅट सेशनमध्ये येणाऱ्या उर्मट आणि उद्धट प्रश्नांना हसुन योग्यं उत्तरं देणारा ....स्पष्टवक्ता , अभ्सासु , हजरजबाबी ....“ रोहित सरदाना ..” गेला. माझ्याशी रोज बोलणारा / भेटणारा मित्रं गेलाय कि काय असं वाटावं ईतका डिस्टर्ब झालोय मी.मला फार फार वाईट वाटलंय"
संकर्षणसह अनेक कलाकारांनी रोहित यांच्या जाण्यानं दु:ख व्यक्त केलं आहे.