By  
on  

"समज देऊन परत घेऊ नका" ही विनंती करत अभिनेता हेमंत ढोमेने या कारणासाठी ट्विटरचं केलं कौतुक

बॉलीवुड अभिनेत्री कंगणा रनौत काहीना काही गोष्टीसाठी सतत वादात असते. टीक टिपण्णी करण, महत्त्वाच्या मुद्द्यांवर वादग्रस्त पोस्ट टाकणं या गोष्टी कंगणा सोशल मिडीयाद्वारे करत असते.. कंगणाने सोशल मिडीयावर एन्ट्री घेतल्यापासून तर ती कायम वादात असते. तिच्या पोस्ट, ट्विट या वादाच्या भोवऱ्यात असतात. याआधी कंगणाची बहीण रंगोलीच्या पोस्ट वादात असायच्या.

कंगणाने आता तर चक्क  मायक्रो-ब्लॉगिंग साइटच्या नियमांचं उल्लघन केलं आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्मिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल कंगणाने ट्विट्सच्या माध्यमातून भाष्य केलं. यानंतर नियमांचं उल्लघन केल्या प्रकरणी कंगणाचं ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आलय. 

 

कंगणाचे ट्विटर अकाउंट निलंबित केल्यानंतर सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस पाहायला मिळतोय. मनोरंजन विश्वातली अनेक कलाकारांनी यावर विविध पोस्ट केल्या आहेत. तर अभिनेता हेमंत ढोमेने ट्विटरचं कौतुक केलं आहे. 

हेमंत त्याच्या पोस्टमध्ये लिहीतो की, "हाहाहाहाहा... कमाल, एक नम्र विनंती समज देऊन परत घेऊ नका... कारण कुठल्याही दंगलींचं... खुनांचं उदात्तीकरण वाईट!" तेव्हा हेमंतने ट्विटरचं कौतुक करत ही विनंती केली आहे. कुठेही कंगणाचं नाव यात लिहीण्यात आलेलं नाही. मात्र त्याने ही पोस्ट कंगणाचा उल्लेख न करता तिच्याविषयीच केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive