By  
on  

पाहा Video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी फिटनेससाठी अशी घेतेय मेहनत

सध्याच्या कोरोना काळात आरोग्य चांगलं रहावं यासाठी विविध व्यायाम, योगा करण्याचे सल्ले दिले जात आहेत. रोगप्रतिकारक शक्ति वाढावी यासाठी अनेक आवाहन केले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात सगळे जण घरात असताना अशावेळी आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार घरात बसून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. 

अनेक सेलेब्रिटी जीम बंद असल्याने घरातच व्यायाम करत आहेत. अनेकांना योगाची आवड आहेत असे कलाकार घरातच योगा करत आहेत. अशात अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला कायमच फिटनेसची आवड असल्याने ती देखील घरातच व्यायाम करतेय. कधी योगा तर कधी वर्कआउट करुन सोनाली स्वत:ला फिट ठेवतेय.

सोनालीने नुकताच तिचा एक वर्कआउट व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केलाय. या व्हिडीओत सोनाली अत्यंत कठिण अशी वर्कआउट करताना दिसतेय. फिटनेस ट्रेनरसोबत व्हिडीओ कॉलच्या माध्ममातून सोनाली फिटनेस ट्रेनिंग घेत आहे. मात्र या फिटनेससाठी सोनाली किती मेहनत घेतेय हे या व्हिडीओमधून पाहायला मिळतय. 

कलाकारांचे असे सकारात्मक व्हिडीओ पाहून अनेकांना ऊर्जा मिळत असेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive