By  
on  

पाहा Photos : ही अभिनेत्री घरात वर्कआउट करुन झाली इतकी फिट

सध्या कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाची गरज आहे. अनेक जण यासाठी योगा आणि विविध वर्कआउट देखील करत आहेत. सध्या राज्यात लॉकडाऊन असल्याने जीम बंद आहेत. म्हणूनच अनेक जण फिट राहण्यासाठी घरातच व्यायाम करत आहेत. फिटनेसच्या बाबतीत मनोरंजन विश्वातील कलाकार कायम सतर्क असतात. त्यामुळे सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांचा फिटनेस फंडा पाहायला मिळतोय.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. सध्याच्या काळात आरोग्य उत्तम रहावं यासाठी सोनाली घरातच वर्कआउट करत आहे. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फिटनेस ट्रेनरच्या सहाय्याने ती विविध वर्कआउट करतेय. त्यामुळे आता सोनालीचा फिट लुक देखील पाहायला मिळतोय.

सोनालीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनालीचा फिट अंदाज पाहायला मिळतोय.

सोशल मिडीयावर या फोटोंना पसंत केलं जात असून, सोनालीच्या या सकारात्मक पोस्टमुळे अनेकांना ऊर्जा मिळणार यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive