पाहा Video : अभिनेते सुनील बर्वे अशी घेत आहेत आरोग्याची काळजी

By  
on  

सध्याच्या कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं ठरतय. विविध व्यायामप्रकार, योगा करून अनेक जण स्वास्थ्याची काळजी घेत आहेत. कोरोना काळातही मनोरंजन विश्वातील मालिका कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजन खंड पडू नये यासाठी मालिकांचे चित्रीकरण करत आहेत. सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु असल्याने अनेक मराठी मालिकांचं चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunil Barve (@sunilbarve)

 

या चित्रीकरणातून वेळ काढून मालिका कलाकार त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेत आहेत. अभिनेते सुनील बर्वे देखील आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओत सुनील बर्वे हे वर्कआउट करताना दिसत आहेत. ट्रेडमीलवर धावत असल्याचा हा व्हिडीओ आहे. मात्र या पोस्टमधून ते सकारात्मक संदेश देत आहेत.

सध्याच्या कठीण काळात न थांबता सतत पुढे जाण्याचा संदेश ते या पोस्टमधून देत आहेत. 

Recommended

Loading...
Share