By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात घुसली अज्ञात व्यक्ति, सोनालीच्या वडीलांवर केला हल्ला

सेलिब्रिटींना भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जाण्याच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या बाबतीत घडली आहे. सोनालीच्या पुण्याच्या घरात काल म्हणजेच 24 मे रोजी एक अज्ञात व्यक्ति घुसली होती. ही अज्ञात व्यक्ति चोर होती की चाहता असा प्रश्न पडलाय. 

काल रात्री सोनालीच्या पुण्याच्या घरात एक चाहता घुसला. यावेळी सोनालीच्या वडिलांनी त्याला घराबाहेर जाण्यास सांगितलं. सोनालीचे वडील त्याला बाहेर जाण्यासाठी सांगत राहिले मात्र त्याने काही ऐकलं नाही. जवळच असलेला चाकू बाहेर काढून त्याने सोनालीच्या वडीलांवर चाकूने वार केले. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेत सोनालीच्या वडिलांच्या हाताला दुखापत झाली आहेमात्र या प्रकरणाने सोनालीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 

सोनालीच्या पुण्यातील निगडी येथील बंगल्यात काल रात्री ही व्यक्ती अचानक दोरीच्या सहाय्याने बंगल्याच्या गॅलरीत घुसली होती. मात्र हा प्रकार लक्षात येताच शेजारी आणि इतर या व्यक्तिला पकडण्यात यशस्वी ठरले. पोलिसांना माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या अज्ञात व्यक्तिला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात पोलीस अधीक तपास करत आहेत.

 या व्यक्तिकडे चाकू आणि मिरची पूड सापडली असल्याचं समोर आलय. या घटनेनंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आणि सगळे सुखरुप असल्याचं सोनालीने पिपींगमून मराठीला सांगीतलंय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive