By  
on  

पाहा Video : गश्मीर महाजनी शूट करत असलेल्या सेटवर लावली या खास पाहुण्याने हजेरी

अभिनेता गश्मीर महाजनी हा इमली या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतोय. सध्या चित्रीकरण करत असताना एक्शन सिक्वेन्समध्ये त्यांची चांगलीच दमछाक होतेय. गश्मीरही हे एक्शन सिक्वेन्स एन्जॉय करतोय. मात्र हेच एक्शन सीन करत असताना सेटवर एका खास पाहुण्याने हजेरी लावली आहे. 

हा पाहुणा आहे गश्मीर महाजनीचा गोंडस मुलगा. गश्मीरच्या दोन वर्षांच्या मुलाने सेटवर नुकतीच हजेरी लावली. यावेळी गश्मीर एक्शन सिक्वेन्स शूट करत होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचा मेकअप करण्यात आला होता. हे पाहुन गश्मीरचा मुलगा मात्र घाबरला. आपल्या वडीलांना लागलं की काय असं त्याला वाटू लागलं. गश्मीरने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओत गश्मीरच्या मुलाचा आवाज ऐकू येतोय.

या व्हिडीओत गश्मीरचा मुलगा म्हणतो की, "लागलं बाबाला"

 

गश्मीर या पोस्टमध्ये लिहीतो की, "जेव्हा माझा 2 वर्षांचा मुलगा मी एक्शन करत असताना सेटवर येतो. तेव्हा तो म्हणतो लागलं बाबाला" गश्मीरने शेयर केलेला हा गोंडस व्हिडीओ अनेकांना आवडलाय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive