अनेक कलाकारांनी गुपचुप लग्न करून नंतर सोशल मिडीयावर लग्नाची बातमी दिल्याचं चित्र कोरोना काळात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या बाबतीतही असच झालय. मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये सोनालीने साखरपुडा केला होता. मात्र त्याची बातमी वाढदिवसाला सोशल मिडीयाद्वारे दिली होती. नुकतच सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबत लगीनगाठ बांधून सुखाचा संसार थाटला आहे. मात्र ही बातमीदेखील सोनाली वाढदिवसाला सगळ्यांसोबत शेयर केली.
18 मे रोजी सोनालीचा वाढदिवस असतो. याच वाढदिवसाच्या निमित्ताने सोनाली कोणती खास बातमी देणार याच्या प्रतिक्षेत चाहते असतात. यावर्षी तर सोनालीने वाढदविसाला चक्क तिच्या लग्नाची गुड न्यूज सगळ्यांना दिली. 7 मे 2021 रोजी लग्न केल्याचं सोनाली सोशल मिडीयावर जाहीर केलं. मागील वर्षी सोनाली आणि कुणालच्या नात्याविषयी चर्चा सुरु होती. त्यानंतर साखरपुड्याविषयी सांगत सोनालीने कुणालसोबतच्या नात्याचा खुलासा सोशल मिडीयावर केला.
नुकतच सोनाली आणि कुणालच्या लग्नाला एक महिना पूर्ण झालाय. एक महिन्यांपूर्वीच दोघांनी सुखाच संसार थाटला आहे. नुकतच सोनाली याविषयी खास पोस्ट केली आहे. पति कुणालसोबतचा फोटो शेयर करत सोनाली अधिकृतपणे पति-पत्नी म्हणून एक महिना पूर्ण झाल्याचं ती या पोस्टमध्ये सांगतेय.
गेल्या काही वर्षांपासून सोनाली आणि कुणाल एकमेकांना डेट करत होते. 7 मे 2021 रोजी सोनाली आणि कुणालने दुबईत अतिशय साध्या पद्धतिने काही जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत आणि कुटुंबासोबत व्हिडीओ कॉलद्वारे लगीनगाठ बांधली होती.