By  
on  

पाहा Video : भाऊ कदमच्या या डायलॉगवर शरद केळकरचा पत्नीसोबतचा व्हिडीओ पाहुन तु्म्हालाही हसू आवरणार नाही

अभिनेता शरद केळकरचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी शरद विविध फोटो आणि व्हिडीओ तो शेयर करत असतो. यात त्याच्या पत्नीसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. यातच शरद केळकरचा पत्नीसोबतचा नवा व्हिडीओ चांगलाच चर्चेच आला आहे. 

या व्हिडीओत शरद केळकर आणि त्याची पत्नी किर्ती पाहायला मिळत आहेत. चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमातील एका स्कीटच्या डॉयलॉगवर हा व्हिडीओ केलाय. यात भाऊ कदमच्या कॉमेडी डायलॉगवर शरद आणि पत्नी कॉमेडी हावभाव करताना दिसत आहेत. शरद हा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा चाहता आहे. त्याने या कार्यक्रमात सिनेमांच्या प्रमोशन दरम्यान हजेरी देखील लावली आहे. म्हणूनच त्याने या व्हिडीओसाठी या कार्यक्रमातील या विनोदी डायलॉगची निवड केली आहे.

 

नेटकऱ्यांना शरदचा पत्नीसोबतचा हा व्हिडीओ प्रचंड आवडलाय. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

शरदचे त्याच्या पत्नीसोबतचे अनेक व्हिडीओ हे चर्चेत असतात. आता हा व्हिडीओ देखील लक्षवेधी ठरला आहे. आत्तापर्यंत विविध मालिका आणि सिनेमांमधून शरद केळकरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लक्ष्मी या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. आता आगामी काळात 'देजा वू' या सिनेमातून शरद केळकर वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive