By  
on  

पाहा Video : चक्क एयरपोर्टवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चे टेलेकास्ट, म्हणून समीर चौगुले यांनी केली ही पोस्ट

हसणं हे आरोग्यासाठी चांगलं असं म्हणतात. आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवतोय. या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे टेन्शनवरची मात्रा म्हणत हा कार्यक्रम तणावमुक्त करतो. 

या कार्यक्रमातील अभिनेते समीर चौगुले यांच्या अभिनयावर, अचुक टायमिंगवर प्रेक्षकांनी पसंती दर्शवलीय. समीर - विशाखा या जोडीचं सादरीकरण मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं. त्यांचे विविध परफॉर्मन्स हे आवर्जून पाहिले जातात. मात्र या कार्यक्रमाविषयी एक खास पोस्ट समीर यांनी सोशल मिडीयावर केली आहे. घरबसल्या प्रेक्षक हा कार्यक्रमत तर पाहतातच पण नुकतच एका एयरपोर्टवर हास्यजत्रा हा कार्यक्रम दाखवण्यात आला. याचविषयीची पोस्ट समीर यांनी केली आहे. 

 

 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम नागपूर एयरपोर्टवरील टेलिव्हिजनवर सुरु असल्याचं चित्र नुकतच पाहायला मिळाला. मग त्याचा व्हिडीओ करून समीर यांनी पोस्ट केला आहे. ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "जीवनात चार घटका हसणं खूप आवश्यक आहे.....नागपूर ऐयरपोर्टला दाखवतायत महाराष्ट्राची हास्यजत्रा..खूप खूप आनंद आणि समाधान...........मनःपूर्वक आभार रसिक प्रेक्षकांचे.....या कौतुकाचे संपूर्ण श्रेय आमच्या संपूर्ण हास्यजत्रा कुटुंबाचे.. सर्व तंत्रज्ञानाचे, बॅकस्टेड कलाकारांचे...विशेष आभार सोनी मराठीचे....बिझनेस हेड अजय भालवणकर आणि नॉन फिक्शन हेड अमित फाळके, सिनियर ईपी गणेश सागडे आणि सिद्दगुरू जुवेकर....…या सर्वांच्या भक्कम आधाराशिवाय हे शक्य नव्हते....खूप खूप आभार......."

ही पोस्ट करून त्यांनी प्रेक्षकांसह हास्यजत्रेच्या टीमचे आभार मानले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive