"शुद्ध उर्दू बोलणं माझ्यासाठी नवीन होतं", 'मीमी' सिनेमासाठी सई ताम्हणकरने घेतले उर्दूचे धडे

By  
on  

'हंटर' आणि 'लव्ह सोनिया' सारख्या हिंदी सिनेमांनंतर आता सई ताम्हणकर लवकरच 'मीमी' या सिनेमातून भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी सईने उर्दू भाषेचे धडे घेतले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ड्रामा-कॉमेडी सिनेमात सईसह क्रिती सनॉन आणि पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या सरोगेट आईच्या कथेत सईची भूमिका ही क्रितीच्या भूमिकेचा महत्त्वाचा आधार असेल.

मीमीच्या ट्रेलरनंतर सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ज्यात सईची व्यक्तिरेखा देखील पाहायला मिळतेय. या सिनेमात सई ही राजास्थानातील मुस्लिम महिलेच्या भूमिकेत आहे. त्यामुळे उर्दूसह बोलण्यातील राजस्थानी  लकब तिला पकडावी लागली आहे. या सिनेमाच्या तयारीतील सईसाठी हा महत्त्वाचा भाग होता. 


याविषयी सई म्हणते की, "उर्दू शिकण्याचा आणि राजस्थानी बोली आत्मसाद करण्याचा अनुभव हा आव्हानात्मक आणि मजेशीर होता. मी उर्दूशी परिचीत आहे पण शुद्ध उर्दू बोलणं माझ्यासाठी नवीन होतं. जे वर्ष उलटून गेलं त्यानंतर अशी महत्त्वाची फिल्म मिळणं यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. मला आशा आहे की आमच्या प्रयत्नांना प्रेक्षकांचं प्रेम मिळेल."

Recommended

Loading...
Share