By  
on  

पाहा Video : या कारणामुळे घाबरली सोनाली खरे, भूषण प्रधानने केला चक्क असा प्रँक

अभिनयासह फिटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली खरे सध्या 'खरे बोल' या नव्या शोमधून पाहायला मिळतेय. या कार्यक्रमातून सोनालीसोबत अनेक फिटनेस फ्रिक सेलिब्रिटी मंडळी पाहायला मिळतात. त्यांच्या फिटनेस टीप्स, फिट होण्याचा प्रवास या आणि इतर बऱ्याच गोष्टी या कार्यक्रमात पाहायला मिळतात. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर पाहायला मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या भागात स्पृहा जोशीची मुलाखत पाहायला मिळाली. तिसऱ्या भागासाठी सोनाली खास गेस्ट घेऊन आली. या गेस्टला पाहुन तरुणींना मात्र प्रचंड आनंद झाला. नव्या भागातील हा पाहुणा म्हणजे अभिनेता भूषण प्रधान.

 

भूषण सोबतच्या या भागाच्या शूटींग दरम्यान भूषण पुश अप्स मारत असताना सोनाली चक्क त्याच्या पाठीवर बसली. काही क्षणातच भूषणच्या पाठीला काहीतर इजा झाल्याचं तिला कळालं आणि सोनाली प्रचंड घाबरली. भूषणही कळवळू लागला. भूषणला या स्थितीत पाहुन सोनाली आणखी घाबरली आणि तेवढ्यात हा सगळा प्रँक असल्याचं भूषणने सोनालीला सांगितलं.

हा प्रँकचा मजेशीर व्हिडीओ सोनालीने सोशल मिडीयावर शेयर केलाय. लवकरच हा खास एपिसोड प्रदर्शित होणार असून सोनालीच्या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल. भूषणसोबतच्या या आगामी भागात काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive