या कारणासाठी उमेश कामतने केलं प्रिया बापटचं कौतुक, हे आहे महत्त्वाचं कारण..

By  
on  

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट ही रियल लाईफ जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. ही जोडी जेव्हा स्क्रिनवर एकत्र येते तेव्हाही प्रेक्षकांना आवडते. मराठी मनोरंजन विश्वातील कपलपैकी उमेश-प्रियाची जोडी कायम गोड जोडी म्हणून ओळखली जाते. एकमेकांच्या कामाचा आदर आणि त्याचं कौतुकही करताना दोघं दिसतात. प्रिया बापट आता पुन्हा एकदा सिटी ऑफ ड्रिम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये पूर्णिमा गायकवाड साकारतेय. प्रियाच्या या कामासाठी तिंच पहिल्या सिझनमध्येही कौतुक झालं होतं. आता पुन्हा एकदा प्रियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात प्रियाला अत्यंत जवळच्या व्यक्तीकडूनही तिला शुभेच्छा मिळाल्या आहेत. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती व्यक्ती आहे प्रियाचा पति उमेश कामत.

उमेशने सोशल मिडीयावर खास पोस्ट करून प्रियाच्या मेहनतीचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सिटी ऑफ ड्रिम्स 2 नुकताच प्रदर्शित झाला असून या सिरीजसाठी उमेशने प्रियासाठी ही पोस्ट लिहीली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

या पोस्टमध्ये उमेश लिहीतो की, "मला तुझा अभिमान आहे प्रिया. तू कुठलीही भूमिका साकारताना ज्या पध्दतीने सर्वस्व पणाला लावतेस, प्रत्येक भूमिका करताना जेवढा वेळ देतेस, जी मेहनत तू घेत असतेस त्याचा मी पहिला साक्षीदार असतो.आणि हे सगळं जवळून पाहत असताना मला तुझा केवळ आणि केवळ अभिमान वाटत असतो आणि तुझं कौतुक वाटत असत. आज सिटी ऑफ ड्रिम्सचा सिझन २ प्रदर्शित होत आहे. खूप खूप शुभेच्छा."

उमेशची ही खास पोस्ट लक्षवेधी ठरतेय. शिवाय उमेश आणि प्रिया हे एका आदर्श कपलचं उदाहरण असल्याचं चित्र पाहायला मिळतय. 

Recommended

Loading...
Share