थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय ! दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत झळकणार मराठमोळी सई ताम्हणकर

By  
on  

आपली मराठमोळी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करतेय. तिच्या कारकिर्दीचा आलेख कायमच उंचावतोय याचाच आणखी एक पुरावा समोर आला आहे. मराठी सिनेविश्वासोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा तितक्याच दिमाखात झळकणारी आपली सई आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही चमकणार आहे. 

सई ताम्हणकर ‘मीमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील तिच्या सहाय्यक भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे.. आता सई नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘नवरसा’ या तमिळ सीरिजमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता सईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सईने  हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सई तामिळ अभिनेता विजय सेतुपथीसोबत झळकताना एका सीनदरम्यान पाहायला मिळतेय. विजय सेतुपथीसोबतच्याया फोटोला  तामिळमध्ये कॅप्शन दिल्याने सर्वांच लक्ष वेधलं आहे. 

 

सईच्या या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत.   ‘नवरसा’ या सीरिजचे दिग्दर्शन आणि निर्मिती जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांनी केले आहे. या वेब सीरीजमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकार झळकणार आहेत. 

Recommended

Loading...
Share