By  
on  

पाहा Video : 'बाप बीप बाप' ची पहिली झलक प्रदर्शित, झळकणार हे कलाकार

वडील-मुलाच्या नात्यातील नोकझोक आणि गोडवा अनेक चित्रपटांमधून मालिकांमधून पाहायला मिळाला आहे. मात्र एका वेब सिरीजच्या माध्यमातून हेचं नातं वेगळ्या पद्धतिने पाहायला मिळणारे. 'बाप बीप बाप' या वेबसिरीजमधून वडील-मुलाची एक नवी कथा पाहायला मिळेल.

नुकताच या वेब सिरीजचा टीझर प्रदर्शित झालाय. अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेता तेजस बर्वे या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेत्री पर्ण पेठेही या सिरीजमध्ये झळकणार आहे. शरद पोंक्षे हे वडिलांच्या भूमिकेत आहेत तर तेजस त्यांच्या मुलाची भूमिका साकारतोय. प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

 

"एकाचं राज्य...दुस-याला ताप! 'बाप बीप बाप" असं म्हणत या वेब सिरीजचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. या टीझरमधून ही बाप-लेकाची हटके जोडी पाहायला मिळतेय. बाप-लेकाची भांडणं, त्यांच्या नात्यातील गोडवा, गप्पा या सगळ्या गोष्टी या सिरीजमधून अनुभवायला मिळतील असं चित्र दिसतय.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive