पति कुणालच्या वाढदिवसाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार हे खास सरप्राईज

By  
on  

7 मे, 2021 रोजी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी लगीनगाठ बांधली. दुबईत काही जवळचे नातेवाईक आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. हे जोडपं नवविवाहित असलं तरी दोघांच्या नात्याला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. 

यातच कुणालचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस जवळ येऊन ठेपलाय. म्हणूनच सोनालीने यंदा कुणालला खास सरप्राईज द्यायचं ठरवलयं. एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने ही माहिती दिली आहे. कुणालचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघं मालदीवला रवाना झाले आहेत. 

या ट्रीपमध्ये कुणालसाठी खास सरप्राईज असल्याचं तिने या वेबसाईटला सांगितलय. मालदीवमधील एका खास ठिकाणी सोनाली कुणालचा वाढदिवस साजरा करणार आहे ज्या ठिकाणची माहिती कुणालला अद्याप नाहीय. तेव्हा यंदाचा कुणालचा वाढदिवस खास होणार यात शंका नाही.

सोनाली आणि कुणाल दोघांना प्रवासाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे दोघं जगभरात विविध ठिकाणी फिरत असतात. दोघांच्या नात्याच्या सुरुवातीच्या पहिल्या वर्षी दोघं पोर्तुगल मग त्यानंतर मॉरिशस अशा सुंदर ठिकाणी फिरण्यासाठी गेले असल्याचं सोनालीने या वेबसाईटला सांगितलय. येत्या 4 ऑगस्टला कुणालचा वाढदिवस असून सोनालीने या वाढदिवसाची खास तयारी केली असणार यात शंका नाही. नुकतच सोशल मिडीयावर सोनालीने कुणालसोबतचा फ्लाईटमधील फोटो शेयर केलाय. 

Recommended

Loading...
Share