By  
on  

पाहा Video : मालदीवमध्ये सोनाली कुलकर्णी पतिसोबत अशी करतेय मजा, हे आहे खास कारण..

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सध्या पति कुणालसोबत मालदीवमध्ये आहे. या मालदीव ट्रीपचं खास कारण आहे. ते कारण म्हणजे सोनालीचा पति कुणालचा वाढदिवस. कुणालच्या वाढदिवसानिमित्ताने सोनालीने खास सरप्राईज प्लॅन केलं होतं. आणि याचसाठी ती कुणालला मालदीव येथे घेऊन आलीय. दोघं मालदीवला पोहोचतात मालदीवच्या निसर्गसौंदर्याची दोघं मजा लुटत आहेत. 

कंदीमा या आयलँडवर सोनालीने कुणालचा वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅन केला होता. म्हणूनच या आयलँडवरील सुंदर ठिकाणी सोनाली आणि कुणाल एकत्र वेळ घालवत आहेत. सोनालीने नुकतच सोशल मिडीयावर कुणालसोबत लाईव्ह येऊन हे सुंदर ठिकाण चाहत्यांनाही दाखवलय.

 

यावेळी सोनाली आणि कुणालने फ्लोटींग लंचही केलं. शिवाय डॉल्फिन पाहण्याचाही आनंद त्यांनी लुटला. या लाईव्ह व्हिडीओत सोनाली आणि कुणालने एकमेकांना काही रॅपिड फायर प्रश्नही विचारले. डॉल्फिन क्वेस्टचा आनंद लुटताना सोनालीने काही डॉल्फिनची दृश्ये कॅमेऱ्यात कैद केली आहेत. 

या खास ट्रीपचे फोटो आणि व्हिडीओ सोनालीने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive