अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या पतिसोबत मालदीवमध्ये सुट्टीची मजा लुटतेय. पति कुणाल बेनोडेकरच्या वाढदिवसानिमित्ताने तिने ही खास ट्रीप प्लॅन केली होती. मालदिवमधील एक खास ठिकाण तिने कुणालला सरप्राईज देण्यासाठी निवडलय. या ठिकाणी दोघंही निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत आहेत.
कुणालच्या वाढदिवसानिमित्ताने सोनालीने खास रोमँटिक डिनर डेटचंही आयोजन केलं होतं. यावेळी समुद्र किनारी सुंदर वातावरणात दोघांची ही डिनर डेट पार पडली. या खास डेटचे फोटो सोनालीने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.
सोनालीने सोशल मिडीयावर या खास ट्रीपचे फोटो पोस्ट केले आहेत.
याशिवाय दोघांनी पुलमधील फ्लोटिंग लंचचाही आस्वाद घेतला आहे. कुणालच्या वाढदिवसानिमित्ताने सोनालीने या खास ठिकाणी केलेलं हे सेलिब्रेशन कुणाललाही प्रचंड आवडल्याचं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. सोनाली आणि कुणालने मालदीवहून खास लाईव्ह सेशनही केलं. जिथे दोघांंनी एकमेकांनी प्रश्न विचारुन रॅपि़ड फायर खेळ खेळला.