By  
on  

पाहा Video : 'शीलावती'च्या मागे लागलाय शिव ठाकरे, नवं गाणं प्रदर्शित

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनचा विजेत शिव ठाकरे आता नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बऱ्याच दिवसांपासून शीलावती या त्याच्या आगामी गाण्याविषयी चर्चा होती. हेच गाणं नुकतच प्रदर्शित झालय. या गाण्यात शीव हा अभिनेत्री मीरा जगन्नाथसोबत झळकतोय. 

या गाण्यात शीव आणि मीराची हटके केमिस्ट्री पाहायला मिळतेय. शिवाय त्यांचा रोमँटिक अंदाजही लक्षवेधी ठरतोय. वरुण लिखातेने हे गाणं गायलं असून त्याचच संगीत या गाण्याला लाभलय. जय अत्रेने हे गीत लिहीलेत.

 

या गाण्यात शीवचा धमाकेदार डान्स पाहायला मिळतोय. तर शीव आणि मीराची केमिस्ट्री लक्ष वेधून घेतेय. या गाण्यात शीलावती कोण साकारणार याची उत्सुकता होती. मीरा जगन्नाथ ही या गाण्यात शीलावती साकारण असल्याचं काही कालावधीनंतर समोर आलं. हे गाणं प्रदर्शित होताच या गाण्याला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. 

मराठी बिग बॉसमधून शिव ठाकरेचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. 'एम टीव्ही रोडीज'मध्येही शिवने त्याच्या हटके अंदाजात सगळ्यांची मनं जिंकली होती. तेव्हा या गाण्यातूनही शिव त्याच्या चाहत्यांची मनं जिंकताना दिसतोय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive