By  
on  

World Photography Day च्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीने शेयर केले पतिने क्लिक केलेले खास ट्रीपचे हे फोटो

जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही विविध पोस्ट केल्या आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील सोशल मिडीयावर या दिनाचं निमित्त साधून खास फोटो शेयर केले आहेत. 

सोनाली आणि पति कुणाल यांनी नुकतीच मालदीव सफर केली. यावेळी दोघांनी या खास ट्रीपचा मनमुराद आनंद लुटला. या ट्रीपचे खास फोटो आणि व्हिडीओ सोनालीने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. यातच जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने याच ट्रीपचे आणखी काही फोटो सोनालीने शेयर केले आहेत.

या ट्रीपला सोनालीचा पति कुणाल यांनी सोनालीचे क्लिक केलेले सुंदर फोटो तिने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

या फोटोंमध्ये निसर्गरम्य सुंदर समुद्रकिनारी सोनालीचे सुंदर फोटो पाहायला मिळतायत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive