By  
on  

महेश मांजरेकर यांच्या तब्येतीत आधीपेक्षा सुधार, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आले घरी

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याचं समोर आलय. यासाठी महेश यांना मुंबईतील एच एन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते घरी विश्रांती घेत आहेत. 

महेश मांजरेकर यांच्या प्रकृतीविषयी त्यांची मुलगी सई मांजरेकरने माहिती दिली आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ती सांगते की, "ते आता ठीक आहेत. आधीपेक्षा त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत आहे. महेश मांजरेकर लवकरच यातून बाहेर येऊन त्यांचा कॅन्सरवरील उपचार आणि बरे होण्याचा अनुभव सांगु इच्छितात. आम्ही त्यांच्या निर्णयाचा सन्मान करतो. पण आता ते काहीच बोलण्याच्या स्थितीत नाहीत. लवकरच ते बरे होऊन स्वत: सर्वकाही सांगतील तोपर्यंत वाट बघुया."

महेश मांजरेकर यांचे काही फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळतायत. या फोटोंमध्ये त्यांची प्रकृती खालावल्याचं स्पष्ट दिसतय. इंडियन आयडल 12 च्या स्पर्धकांसोबतचे महेश मांजरेकर यांचे फोटो सध्या चर्चेत आलेत. लवकरच त्यांची प्रकृती बरी होऊन ते पुन्हा जोमाने कामाला लागतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive