Video : अप्सरेने घेतला 'अहों'साठी हा खास उखाणा, तुम्ही ऐकलात का?

By  
on  

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी यंदा मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. सोनाली आणि कुणालचा विवाह सोहळा दुबईत पार पडला. सोनालीचा पती हा एनआरआय आहे. अनेकदा आपल्या अफलातून केमिस्ट्रीचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत सोनाली-कुणाल कपल गोल्स देतात. त्यांच्या प्रत्येक फोटो-व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. 
 

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरची जोडी चाहत्यांना प्रचंड पसंत आहे. सोनाली ही नवविवाहिता असल्याने अनेक सोहळ्यांमध्ये तिचं भरभरुन कौडकौतुक केलं जातं. नुकतंच एका पुरस्कार सोहळ्यात सोनालीला सर्वौत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात स्टेजवर पुरस्कार स्विकारण्यासाठी आलेल्या सोनालीला सुप्रसिध्द निवेदिका मेघना एरंडे हिंने उखाणा घेण्याचा आग्रह केला. 

मग काय, अप्सरेने एक झक्कास उखाणा घेत नेहमीप्रमाणेच उपस्थितांची मनं जिंकली. 
 

 

सोनालीने पुरस्कार सोहळ्यात घेतलेल्या या उखाण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. या व्हिडीओवर तर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव होतोय,

Recommended

Loading...
Share