By  
on  

यंदाचा उन्हाळा होणार ‘सनी', या सिनेमात झळकणार ललित प्रभाकर

मराठी मनोरंजन विश्वातील एक चेहरा तरुणींच्या ह्रदयातील ताईत आहे. तो अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. मालिका विश्वात प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता ललित सिनेमांमधून त्याच्या अभिनयकौशल्याने लक्षवेधी ठरतोय. 'आनंदी गोपाळ' सिनेमातून ललितच्या कामाने लक्ष वेधलं होतं. तर विविध वेबसिरीजमधूनही ललित सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. यातच ललितच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय.

सनी असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. हेमंत ढोमे या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. तर इरावती कर्णिक यांचं लेखन या सिनेमाला लाभलय.  2022 च्या उन्हाळ्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मिडीयावर सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.

ललित आणि हेमंत ढोमेसह अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर या सिनेमाची घोषणा केली आहे. ललितने त्याच्या सिनेमाची घोषणा करत लिहीलय की, "यंदाचा उन्हाळा होणार सनी". या सिनेमात ललित सनीची भूमिका साकारणार आहे. तेव्हा सनी हाच या सिनेमाचा मध्यवर्ती भाग असल्याचं पाहायला मिळतय. तेव्हा हा सिनेमा नेमका काय असेल याविषयी प्रेक्षकांंमध्ये उत्सुकता निर्माण झाली असेल एवढं नक्की.

'सनी'बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात की, "हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे. यातील ‘सनी’चे आयुष्य काही प्रमाणात मी स्वतःही जगलो आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा माझ्या खूप जवळची आहे. ललित प्रभाकर या भूमिकेला तो योग्य न्याय देऊन त्यात रंग भरेल याची खात्री आहे आणि अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत प्रथमच काम करत असल्याने मी खूप उत्सुकही आहे आणि त्याचा आनंदही आहे.'' 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive