By  
on  

पाहा Photos : मालदीवमध्ये सई लोकूर आणि तिर्थदीपचा हनीमून

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्री सई लोकूरने तिर्थदीप रॉयसोबत लगीनगाठ बांधली होती. 30 नोव्हेंबर 2020 रोजी दोघांनी लग्न केलं होतं. तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे कपल सोशल मिडीयावर चर्चेत असतं. या कपलचे खास क्षण आणि त्याचे फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. 

नुकतच सईने सोशल मिडीयावर दोघांच्या हनीमूनचे फोटो शेयर केले आहेत. लॉकडाउन आणि कोरोनामुळे देशाबाहेर जात येत नसल्याने अखेर दोघं हनीमूनसाठी देशाबाहेर गेले आहेत. मालदीव हे त्यांच्या हनीमूनचं खास डेस्टिनेशन आहे. 

मालदीवमध्ये सई आणि तिर्थदीप निसर्गरम्य वातावरणाची मजा लुटत आहेत. या खास ट्रीपचे फोटो सईने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. लाल रंगाच्या स्वीम सूटमधील तिचे फोटोही तिने यात शेयर केले आहेत.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये सई लोकूर स्पर्धक म्हणून दिसली होती. त्यानंतर सईचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. मागील वर्षी सईच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. सईने सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिर्थदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive