By  
on  

पाहा Photos : मालदीवमध्ये सई लोकूर आणि पति तिर्थदीप लुटतायत सुट्टीची मजा

अभिनेत्री सई लोकूरने बॉयफ्रेंड तिर्थदीपसोबत मागील वर्षी लगीनगाठ बांधली होती. त्याआधी सईने सोशल मिडीयावर तिर्थदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. नुकतच सई आणि तिर्थदीप हे त्यांच्या हनीमून ट्रीपसाठी गेले आहेत. हनीमूनसाठी त्यांनी मालदीव या सुंदर ठिकाणची निवड केली आहे.

मालदीवमध्ये सई आणि तिर्थदीप सुट्टीची मजा लुटताना दिसत आहेत. सईने या खास ट्रीपचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. सईने तिचे स्विम वेअर आउटफीटमधील फोटोही शेयर केले आहेत.

शिवाय यावेळी सई आणि तिर्थदीपने स्विमिंग पुलमध्ये तरंगणारा नास्ता म्हणजेच फ्लोटिंग ब्रेकफास्टचा आनंद लुटलाय.

यावेळी सईने स्कुबा डायविंगही केलय. स्कुबा डायविंग करताना समुद्राच्या पाण्यात विविध मासे आणि कासवही तिला पाहता आलेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive