'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'चं मोशन पोस्टर प्रदर्शित, इंग्रजी भाषेत चित्रित होणारा पहिला मराठी चित्रपट

By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटांची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. यापैकीच एक म्हणजे 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'. या चित्रपटात सोनाली ही ताराराणीच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. यात सोनालीचा ताराराणी भूमिकेतील रुप पाहायला मिळतय.

हा जगातील पहिला मराठी - हॉलीवूड चित्रपट असेल. तर मराठी आणि इंग्रजी भाषेत चित्रीत होणारा पहिला मराठी चित्रपट असेल. या चित्रपटातून शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची ज्वलंत आख्यायिका पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला अबाधित राखण्याचे काम त्यांच्या निधनानंतर अनेक छत्रपतींनी केले. पण या स्वराज्य रक्षणाच्या कार्यात महत्वाच्या ठरतात त्या छत्रपती ताराराणी.   

 

अक्षय विलास बर्दापूरकर, 'प्लॅनेट मराठी', 'गोल्डन रेशो फिल्म्स', 'ब्लॅक हँगर स्टुडिओज' आणि 'ओरवो स्टुडिओज्' हा चित्रपट सादर करणार असून राहुल जाधव दिग्दर्शन करतायत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या मोशन पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलय.उत्तम दर्जाचे व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स असणाऱ्या या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.  

 

 

Recommended

Loading...
Share