By  
on  

पाहा Video : अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमात अमृता खानविलकर आणि अभिज्ञा भावेची हजेरी

लवकरच अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच दोघांचा साखरपुडा देखील संपन्न झालाय. मात्र सध्या लग्नाचे विविध कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडताना दिसत आहेत. या कार्यक्रमांसाठी अंकिता आणि विकीच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी हजेरी लावलीय. यावेळी मनोरंजन विश्वातील अंकिताच्या खास मैत्रिणींनी देखील हजेरी लावली होती.

 

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अंकिताची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यामुळे या विविध कार्यक्रमात अमृताची हजेरी पाहायला मिळाली. अंकिता-विकीच्या मेहंदी आणि संगीत कार्यक्रमात अमृताने धमाल डान्स करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी अंकिता आणि अमृताने एकत्र डान्सही केला. 

 

पवित्र रिश्ता मालिकेच्या दुसऱ्या ओटीटी सिझनमध्ये अभिनेत्री अभिज्ञा भावे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे अंकिता आणि अभिज्ञाची देखील चांगली मैत्री झालीय. म्हणूनच अभिज्ञा देखील या विविध कार्यक्रमांमध्ये हजर होती. 

अंकिता आणि विकीच्या लग्नाआधिच्या या विविध कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive