By  
on  

पुष्कर जोगचा बॅक टू वर्क मोड ऑन

मराठी बिग बॉसमध्ये अंतिम फेरीत टॉप 3 स्पर्धकांमध्ये पोहचण्याचा मान मिळवणारा अभिनेता पुष्कर जोग याने कार्यक्रमातून बाहेर आल्यावर कुटुंबिय आणि मित्रपरिवाराला वेळ दिला आणि तो पुन्हा बॅक टू वर्क मोड घेतला आहे. अस्सल पुणेकर असलेला पुष्कर आता जोमाने आपल्या प्रोजेक्ट्सना सुरूवात करतोय.

https://www.instagram.com/p/BmIgHEEhCGn/?taken-by=jogpushkar

पुष्करची प्रमुख भूमिका असलेला ‘ती अॅंड ती’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. पुष्करने या सिनेमाच्या डबिंगला सुरूवात केली आहे. याबाबत त्याने नुकतंच सोशल अकाउंटवरुन डबिंगचा फोटो शेअर करत याबाबतची माहिती आपल्या फॅन्सना दिली. तो म्हणतो, “ माझा आगामी सिनेमा ‘ती अॅंड ती’च्या डबिंगला मी सुरूवात केली आहे. अधिक माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवेन .”

बिग बॉसमध्ये 90 दिवस राहिल्यानंतर पुष्करने आठवड्याभराचा ब्रेक घेतला आणि लवकरच तो पुन्हा आपल्या प्रोजेक्ट्सकडे वळला आहे. ‘ती अॅंड ती’ या आगामी सिनेमात पुष्करसोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी झळकत आहेत. तर या सिनेमाचे दिग्दर्शन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले असून पुष्करच्या या सिनेमाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive