By  
on  

सलमान खान आणि दिपीका पडद्यावर येणार का एकत्र?

बॉलिवूडमध्ये बरेच दिवस एक चर्चा रंगली होती, ती म्हणजे सुप्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि दबंग सलमान खान एकत्र येणार असल्याची. सलमान संजय भन्साळी यांच्या ‘ईंशाअल्लाह’ या सिनेमात झळकणार असल्याचे समजते  आहे. तर महत्त्वाची बातमी म्हणजे सलमानसोबत या सिनेमात दिपीका पदुकोणला नायिका म्हणून घेण्याचा विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे.

मिडीया रिपोर्ट्सनुसार, मागच्याच महिन्यात भन्साळी यांनी या सिनेमाचे नाव निश्चित केले. संपूर्ण सिनेमाची पूर्व तयारी करण्यासाठी त्यांना 6-9 महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती आहे. तसेच प्रत्यक्ष सिनेमाचे शुटींग सुरू करण्यास त्यांना पुढचं वर्ष उजाडणार आहे. भन्साळी यांनी यापूर्वी दिपीकासोबत तीन सिनेमे केले आहेत. या सर्व सिनेमांची ती नायिका होती. या सर्वच सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता या नवीन प्रोजेक्टमध्ये ते दिपीकासोबत सलमानला को-स्टार म्हणून घेऊ इच्छितात.

 

आजपर्यंत दिपीका आणि सलमान ही जोडी ऑन-स्क्रीन पाहायला मिळाली नाही. ब-याचवेळा यापूर्वी ते एकत्र काम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण जमून आले नव्हते. आता दोघांच्याही चाहत्यांना त्यांना एकत्र ऑन-स्क्रीन पाहायला मिळणं ही एक ट्रिटचं ठरणार आहे.

दरम्यान सलमान खान सध्या ‘भारत’च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. तसंच मुंबईतील या सिनेमाचं पहिलं शेड्यूलसुध्दा त्याने पूर्ण केलं आहे. तसंच एका छोट्या ब्रेकनंतर पुढच्या शेड्यूलसाठी ‘भारत’ची टीम परदेशी रवाना होणार आहे. आता दिपीकाचं म्हणाल तर, सध्या तिच्या आणि अभिनेता रणवीर सिंहच्या लग्नाच्या चर्चा जोरात सुरू आहेत. काही रिपोर्ट्सच्यानुसार त्यांचं लग्न नोव्हेंबर होणार आहे.

दरम्यान सर्वांनाच दिपीका आणि सलमानच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची उत्सुकता लागून राहिली आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive